जनतेज न्युज

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींचा होणार सन्मान

प्रथिनिधी, बीड : बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन होणार आहे. 3 जून हा दिवस भाजप नेत्या पंकजा मुंडे संघर्ष दिन म्हणून साजरा करतात. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. उद्या याच ठिकाणी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. दरम्यान यावेळी गोपीनाथ गडावर जावून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यक्रम ठिकाणाचा आढावा घेतला आहे. दोन वर्षात कोविडमुळे या ठिकाणी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. यंदा पंकजा मुंडे यांनी आपल्या सोशल हँडल वरून मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत मुंडे प्रेमींना आवाहन केलं आहे. सालाबाद प्रमाणे यंदा देखील अभिवादनासाठी मुंडे प्रेमी इथे येतील. यावर्षी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण येणार आहे.