प्रथिनिधी, औरंगाबाद : आज गुरुवार दोन जून रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट औरंगाबाद शाखेच्या वतीने माहिती देण्यात आली की औरंगाबाद परिसरातील नाईक नगर देवळाई परिसरात गट क्रमांक 100 मध्ये बांधकाम पाडून या ठिकाणी मनापाशी बांधकाम परवानगी न घेता अग्निशामक विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदरील बांधकाम करण्यात आले असून या प्रकरणी संबंधित वर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने मनपा कार्यालयासमोर संयुक्त उपोषण सुरू करण्यात आली आहे. हे उपोषण जिल्हाध्यक्ष आदित्य वाहुळे, यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात येत असल्याची माहिती आज रोजी देण्यात आली आहे सदरील उपोषण कार्यालयासमोर आजपासून सुरू करण्यात आले आहे.जेव्हा पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे.
