प्रथिनिधी, बुलडाणा : बुलडाणा जिल्हा सार्वत्रीक सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील प्रारुप प्रभाग रचना 2 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली, यामध्ये मागील निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यात, जिल्हा परिषदेचे एकूण 60 गट तर पंचायत समितीचे एकूण 120 गण होते , ज्यामध्ये आता आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने 8 गट आणि 16 गणाची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्यात 68 जिल्हा परिषद गट आणि 136 पंचायत समिती गण असणार आहेत, तरी या प्रारूप प्रभाग रचना संदर्भात जिल्ह्यातील नागरिकांना काही हरकती असल्यास त्यांनी 2 जून ते 8 जून या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करून आपल्या हरकती नोंदवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
