जनतेज न्युज

दुचाकी वाहने चोरणारी टोळी भोकरदन पोलिसांनी केली जेरबंद..

2 बुलेटसह 8 दुचाकी वाहने जप्त
प्रतिनिधी , भोकरदन : भोकरदन तालुक्यात दुचाकी वाहने चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे भोकरदन पोलीस निरीक्षक सि.पी.काकडे, पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांच्यासह पोलीस पथकाने तापासचक्रे फिरवून वाहने चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.भोकरदन शहरातून चोरलेली दुचाकी वाहने औरंगाबाद येथे कांचनवाडी परिसरात विक्री करण्यासाठी ही टोळी आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी व अन्य ठिकाणी छापे मारून चोरट्याना पकडण्यात आले. या टोळीतील कृष्णा सहाणे, शरद जाधव, किशोर गाडेकर, कृष्णा जाधव, आदिनाथ चोरमारे यांना अटक करण्यात आली आहे.
19 ते 24 वयोगटातील दुचाकी चोरट्यांची टोळी..
हे सर्व चोरटे 19 ते 24 वयोगटातील असून भोकरदन शहर व परिसरातील रहिवाशी आहेत. त्यांच्या कडून 2 बुलेट सह 8 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ही टोळी जेरबंद करण्यात आल्यामुळे दुचाकी वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच हे यातील काही चोरटे हॉटेल वर काम करणारे आहेत हे पैशांच्या हौसेपोटी या मार्गाकडे वळले आहे.
पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे, पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस कर्मचारी सतीश लोखंडे, समाधान जगताप आदींनी कामगिरी केली आहे.