प्रतिनिधी , औरंगाबाद : आरोग्य सेवा म्हणटली तर डॉक्टर नंतर येते टी म्हणजे रुग्णवाहिका होय. रुग्णवाहिकेतून प्रवास करणाऱ्या रुग्णाच्या जीवन मरणाचा प्रवास होय रुग्णवाहिका वेळेवर रुग्णालयात पोहचली नाही तर त्यातील रुग्ण दगावण्याची मोठी शक्यता असते. त्या साठी रुग्णवाहिका चालकांना आपल्या जीवावर खेळून त्या अत्यवस्थ रुग्णाला रुग्नालयात पोहचून देतात. असा महत्वाच्या रुग्ण वाहिका चालकाची आज पगारा अभावी दुरवस्था झाल्याचे चित्र सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका व १०८ रुग्नवाहिका चालकाची झाली आहे. या चालकांना मागील दोन महिन्यां पासून पगार झाला नसल्याने अनेक आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. तसेच येथील रुग्णवाहिकेची दुरवस्था झाली असून रुग्णवाहिकाचे चाकाची टायर खराब झालेलं असून वेळोवेळी रुग्णवाहिका नादुरुस्त होत आहे.
प्रशासकीय पातळीवर लवकर हालचाली करून पगार वेळेवर करण्याची मागणी रुग्ण वाहिका चालकाकडून होत आहे.
