प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एका१२वर्षीय आदिवासी गरीब मुलीवर एका३४वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना तिवसा पोलीस ठाण्या अंतर्गत उघडकिस आलेली आहे, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तासाभरातच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तर आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे सदर मुलगी व आरोपी एका गावातील असून तिला गावाजवळील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार आरोपीने केला, यात आरोपी विठ्ठल कामठे आरोपीचे नाव आहे,सदर घटनेची तक्रार मुलीच्या आईने तिवसा पोलीस ठाण्यात दिलेली आहे,तर पीडित मुलगी ही ७ व्या वर्गात शिक्षन घेत आहे, तिवसा पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्काराच्या कलम३७६,(३),सह कलम४,६,पोस्को सह अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,तर या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यातील संतापाची लाट पसरली आहे,तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता पुढे येते आहे
