प्रतिनिधी , सांगली : पेट्रोल,डिझेल आणि गॅस दरवाढी निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आल्या.. अदानी अंबानी बँक येथे पेट्रोल विकत घेण्यासाठी कर्ज मिळेल असा प्रतिकात्मक बॅनर करून अनोखे आंदोलन करण्यात आले.. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते..
केंद्र सरकार चे खाली डोके वर पाय, कहा गये अच्छे दिन, वारे मोदी तेरे अच्छे दिन, भाजप सरकारचा धिक्कार असो अश्या घोषणाबाजी यावेळी देण्यात आल्या..
पेट्रोल डिझेल चे दर गगनाला भिडले आहेत.. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.. याना जागे करण्यासाठी हे आंदोलन काँग्रेस तर्फे करण्यात आले..
