जनतेज न्युज

कोल्हापूरात चक्क मुदत संपलेले सलाईन रुग्णाला दिल्याचा प्रकार उघडकीस

प्रतिनिधी , कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क मुदत संपलेले सलाईन रुग्णाला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अक्षम्य हलगर्जीपणावरून आता सीपीआर रुग्णालयावर टीकेची झोड उठताना दिसत आहे.
कोल्हापुरात सीपीआरमध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ, मुदत संपलेले सलाईन रुग्णाला दिलेयाविषयी सविस्तर वृत्त असे की, पेठ वडगावमधील 75 वर्षीय महादेव खंदारे यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना मुदत संपलेले सलाईन दिल्याची बाब त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हे सलाईन दाखविले. यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उलट आपला रुग्ण दगावला का? असा प्रतिप्रश्न केला. यानंतर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे याची लेखी तक्रार केली. दरम्यान, या अक्षम्य हलगर्जीपणावर आता टीकेची झोड उठताना दिसत आहे.