प्रतिनिधी , वाशिम : दिल्लीत शेतकऱ्ंयाचं सुरू असलेले आंदोलन मोदी सरकारच्या मनात असतं तर काही वेळात आंदोलन सुटलं असतं. मात्र,शेतकरी आंदोलन सोडविण्याऐवजी त्यांच्या रस्त्यात खिळे टोचण्याचं काम या सरकारने केलं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. वाशिम मध्ये सवांद यात्रे निमित्त ते आले असता बोलत होते. याचवेळी त्यांना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला यावर विचारले असता आमच्याकडे 173 आमदार असून,सरकारला यापासून काहीच धोका नाही याउलट भाजपचे काही आमदार आमच्याकडे येणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
