प्रतिनिधी , पुणे : दिल्लीत आज शेतकरी चक्काजाम आंदोलन करतायेत, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुण्यातील हडपसर रस्त्यावर शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. रास्ता रोको करताचं वाहतूकीला अडथळा नको म्हणून कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय वानवडी पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांना पोलीस गाडीत घालून नेण्यात आलं आणि पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतं आंदोलन संपवलं.केंद्र सरकारने लवकरात लवकर तोडगा काढला नाहीतर मग मात्र जेलभरो आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय.
