बुलडाणा – अकोला महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा…
प्रतिनिधी , बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज बुलडाणा – अकोला मार्गावरील वरवंड फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा लागल्या होत्या..
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलडाणा – अकोला मार्गावरील वरवंड फाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे आंदोलन स्वाभिमानीचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंद्रशेखर चंदन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
