जनतेज न्युज

दौंडचे dysp राहुल धस यांचा गनिमी कावा, अवैध वाळू उपसा करणाऱ्या 10 बोटी जप्त करीत 1 कोटी 15 लाख 50 हजारांचा मुद्देमाल केला नष्ट, 5 वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल…

प्रतिनिधी , दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस आणि त्यांच्या टीमने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत साध्या वेशात जाऊन वाटलुज गावच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 10 बोटींसह 1 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. भीमा नदीच्या पात्रात सेक्शन बोटीच्या सहाय्याने मोठया प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जात होता या कारवाईने वाळू माफियांना दौंड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या 5 वाळू माफियांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.