प्रतिनिधी , भिवंडी : दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पत्नी आणि तिन्ही मुलांच्या मृतदेह पाहून वडिलांनाही विष प्राशन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर भिवंडीतील इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
हि धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील उबंरखांड पाच्छापूर जंगलात घडली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. श्रीपत बच्चू बांगरी असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांनाचे नाव आहे. तर पत्नी रंजना (वय ३०) ,मुलगी दर्शना (वय, १२), रोहिणी (वय ६) आणि मुलगा रोहित (वय ९) असे झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत. मात्र संशयास्पद आणि भयंकर अश्या घटनेच्या तपासाचे पोलिसांच्या समोर आव्हान उभे ठाकले आहे.
