जनतेज न्युज

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा – पुनम पवार

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड शहरात भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये धनंजय मुंडे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदनभाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी वीपिन ईटणकर यांना देण्यात आले. यावेळी या आंदोलनात शेकडो महिलांचा समावेश होता. भाजप महिला मोर्चाच्या सचिव पुनम पवार यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथ पत्रामध्ये दुसऱ्या विवाह विषयी चुकीची माहिती देऊन शासनाला फसवले असुन त्यांनी त्यांनी त्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली.