जनतेज न्युज

धुळे महानगर पालिका स्कॉच ॲवॉर्ड ने सम्मानित

प्रतिनिधी , धुळे : स्वच्छता व आनुषंगिक कामांसाठी अद्यावत यंत्रसामग्रीचा वापर करण्याच्या अनुषंगाने स्कॉच संस्थेने घेतलेल्या स्कॉच ॲवॉर्ड स्पर्धेत धुळे महानगर पालिकेला रजतपदक प्राप्त झाले आहे. धुळे महापालिकेने शहरातील भूमिगत गटारी साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या रोबोटिक मशिनच्या संदर्भाने स्पर्धेत सहभाग घेतला होता.
याबद्दल अधिक माहिती देताना मनपाचे आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले की, स्वच्छता व आनुषंगिक कामांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुषंगाने स्कॉच संस्थेतर्फे संपूर्ण देशभरातील महानगर पालिका, नगर पालिका व जिल्हा प्रशासनासाठी संयुक्‍त स्पर्धा घेतली होती. त्यात स्कॉच ॲवॉर्डसाठी ७ नोव्हेंबरला धुळे महापालिकेने सहभाग नोंदवून नामांकन प्राप्त केले होते. या ॲवॉर्डसाठी २० टक्‍के नागरिकांचे अभिप्राय व ८० टक्के परीक्षकांचे अभिप्राय असे गुणांचे विभाजन केले होते. यात देशभरातील एक हजारापेक्षा जास्त महापालिका, नगर परिषदांनी सहभाग घेतला होता. त्यात धुळे मनपाला स्कॉच ॲवॉर्ड ने सम्मानित करून रजतपदक प्राप्त केले प्रदान करण्यात आले आहे.