प्रतिनिधी , औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मध्ये 1680 कोटींच्या, पाणीपुरवठा योजनांचा शुभारंभ केला. हा शुभारंभ नुसता शुभारंभ होता का खरंच त्याची सुरुवात होणार आहे? का खरच या कामाची पूर्तता महानगरपालिका कडून किंवा राज्य सरकार कडून होणार आहे का? कारण ज्या कामाची पूर्तता करण्यासाठी 633 कोटी रुपये महानगरपालिकेने भरावं त्याआधारे 1680 कोटी रुपयाची जलवाहिनी पूर्ण होणार या दृष्टिकोनातून या जल वाहिनीचा शुभारंभ संभाजीनगरात झाला महानगरपालिका चारशे कोटी रुपयांच्या तोट्या मध्ये आहे महानगरपालिकेकडे कोणत्याच प्रकारचा पैसा नाहीये त्यामुळे 633 कोटी येणार कुठून
असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष संजय केणेकर यांनी आघाडी सरकारला प्रश्न केला आहे.
यावेळी संजय केणेकर म्हणाले की ठेकेदाराला वर्क ऑर्डर भेटली नाही हा कामाचा नुसता शुभारंभ आहे शिवसेना ही जनतेला ट्रेलर दाखवते पूर्ण पिक्चर दाखवू शकत नाही त्यामुळे राज्य सरकार आणि महापौर ही जनतेची दिशाभूल करत आहे जलवाहिनीचे पाणी नळावाटे येईल की नाही याची शंकाच आहे.
