जनतेज न्युज

नंदुरबार जिल्ह्यात गुटख़्याचा अवैध धंदा अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष…

प्रतिनिधी , नंदुरबार : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यात गुटखाबंदी असताना शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करण्यात येत आहे .मोठ्या प्रमाणात दिवसाआड लाखोच्या गुटख्याची तस्करी सुरू आहे.
नंदुरबार जिल्हा लगत असलेल्या गुजरात राज्यातील निझर परिसरातून गुटख्याच्या गोडाऊन मधून कंटेनर द्वारे तसेच पिकअप वाहन द्वारे गुटख्याची वाहतूक करण्यात येत असते रात्रीच्या अंधारात तर कधी दिवसा खुलेआम गुटखा नंदुरबारात दाखल होतो, परंतु असे असताना देखील याकडे पोलिस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे लोक डॉउन च्या कालावधीत गुटखा सहज उपलब्ध होत नसल्याने गुटख्याच्या किमतीत कमालीची वाढ झालेली दिसली होती सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपयांत मिळणारे गुटख्याची पोती 80 ते 90 हजारावर पोचली होती यामुळे व्यवसायात फार नफा दिसल्याने मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या व्यवसाय नंदुरबार जिल्ह्यात सुरु झाला. खरे पाहता तर दररोज किंवा दिवसाआड गुटख्याची वाहतूक होत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे कारवाई करण्याचे प्रमाण नगण्य आहे .यामुळे नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात गल्लीबोळात असणाऱ्या पान सेंटरवर गुटका सहज उपलब्ध होत असतो यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते बोलण्यास स्पष्ट नकार देत आहेत आमचे ऑफिस धुळ्याला असून धुळे अधिकारी बोलतील आम्ही बोलू शकत नाही असे नंदुरबार येथील अधिकारी सांगताना दिसतात .त्यामुळे गुटखा व्यापाऱ्यांकडून संबंधित विभागाला कारवाई टाळण्यासाठी काही लोभ दिला जात आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत असताना दिसत आहे…..