प्रतिनिधी, नंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई जाणे आता सोयीचे झाले आहे नंदुरबार येथून मुंबई सेंट्रल साठी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे .खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत नंदुरबार मुंबई रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 380 पैकी सुमारे 248 जणांचे तिकीट बुकिंग करण्यात आले होते .नंदुरबार हुन मुंबई जाण्यासाठी अनेकदा नागरिकांना थेट रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी येत होत्या यामुळे खा. डॉ.हिना गावित यांनी सातत्याने नंदुरबार हुन मुंबई साठी रेल्वे सुरू करावी यासाठी पाठपुरावा करत होत्या आणि अखेर या मागणीला यश आले आहे. नंदुरबार ते मुंबई सेंट्रल साठी गाडी क्रमांक 19425 सुरू करण्यात आली आहे.
खा. डॉ. हिना गावित यांनी रेल्वे स्थानकावर गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर नंदुरबार हुन रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना झाली .सदर रेल्वे दररोज दुपारी 2 वाजता मुंबईकडे रवाना होणार असून रात्री 12.50 वाजता मुंबईला पोहोचणार आहे तर मुंबई सेंट्रल होऊन गाडी क्रमांक 19426 रात्री 10.30 वाजता नंदुरबार कडे रवाना होणार असून सकाळी 9 .50 वाजता नंदुरबार येथे पोहोचणार आहे .मुंबई साठी रेल्वे सुरू झाल्यामुळे प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणावर वेळ वाढणार असून प्रवास सोयीचा झाला आहे रेल्वे सुरू झाल्याबद्दल प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
