प्रतिनिधी, भंडारा : महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांच्यावर देशविरोधी कृत्य केल्याबद्दल ईडी ने कारवाई केली असुन सदर कारवाई ही ईडी ला मिळालेल्या सक्षम पुराव्याच्या आधारे करण्यात आली आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला राजकारणाचा भाग असल्याचे भासवुन मुळ विषयाला भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहे.एवढया मोठया प्रकरणात राज्याच्या एका मंत्र्यावर एवढी मोठी कारवाई झाली असतांना नवाब मलीक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देणे विंâवा पक्षाने त्यांना मंत्रीपदावरून बाजुला करणे अपेक्षीत होते मात्र तसे अद्यापही झाल्याचे दिसुन येत नाही. यावरून पक्ष नवाब मलीक यांची पाठराखण करीत असल्याचे दिसुन येत असल्याचा आरोप भंडारा–गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी आज भंडारा पत्रकार परिषदेतुन केली.
