प्रतिनिधी, चांदवड : चांदवड तालुक्यातील भरवीर येथील शेतकरी रघुनाथ जाधव यांनी लागवडीची पारंपारिक पद्धत बदली असल्याने वाफ्या ऐवजी बेड पद्धतीने केवळ 18 गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या रताळ्याच्या पिकातून या शेतकऱ्याला दोन लाख रुपयाची आर्थिक उत्पन्न मिळाले
विशेष म्हणजे एका एका रताळाचे वजन थोडेथिडके नाही तर तब्बल साडेसहा ते सात किलो पर्यंत होते
तसेच हा माल मनमाड मालेगाव येथील बाजारपेठांमधील विकलेल्या त्यांच्या या मालाला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल वीस रुपये किलोचा दर मिळाला अठरा गुंठा मध्ये त्यांना सुमारे दहा टनांच्या आसपास उत्पन्न मिळाले तसेच हा माल महाशिवरात्रि पूर्वीच सर्व माल जागोजागी विकला गेला आहे महाशिवरात्रीच्या उपवासाला रताळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात यामुळे या काळात रताळ्याना चांगली मागणी असते हीच बाब लक्षात घेऊन भरवीर येथील शेतकरी रघुनाथ जाधव यांनी आपल्या घरा मागील 18 गुंठे क्षेत्रात चार महिन्यापूर्वी रताळ्याची लागवड केली तसेच संपूर्ण शेणखताचा आणि पोषक विद्राव्य खतांचा वापर केला त्यांना साधारण सात ते आठ हजार रुपये खर्च आला या पिकाला पूर्ण होण्यासाठी चार ते पाच महिन्यात सरासरी लागते तसेच या रताळ्याच्या मालाचा प्रकार पाहून शेतकरी आचार्य चकित झाले व आजूबाजूला देखील आम्ही हे लावू असा प्रकारची चर्चा होऊ लागली यासंदर्भात शेतकरी रघुनाथ जाधव यांनी अधिक माहिती दिली
