जनतेज न्युज

नवीमुंबईतील असंख्य शिवसैनिक मातोश्री कडे रवाना

प्रतिनिधी, मुंबई : शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडालीला सुरुवात झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनामध्ये महाराष्ट्र मधून ठीक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरताना दिसत आहेत .आज त्याचाच प्रत्यय म्हणून नवीमुंबई तील शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये मातोश्री येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा दर्शवणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईतून शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते हे मातोश्रीवर निघाले असून ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगितले जाते तर यावेळी त्यांनी आपण मातोश्रीवर का चाललो होतो यावर काहीही बोलण्यास नकार दिला.या वेळी नवी मुंबई चे जिल्हा प्रमुख मोरे उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर,शहर प्रमुख विजय माने यांच्यासह अनेक विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत..यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हे सर्व शिवसैनिक रवाना झाले.