प्रतिनिधी, मुंबई : भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदार संघाचे भाजपा आमदार आहेत. 164 इतक्या बहुमताने राजन साळवी यांना पराभूत करत विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. याचाच जल्लोष आज भाजप प्रदेश कार्यालयात साजरा होतोय. ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फुगड्या खेळत आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
