प्रतिनिधी, बुलडाणा : वृक्ष लागवड व संगोपन करणे या उद्देशातून दरवर्षी वन महोत्सव सप्ताह राबविल्या जात असतो. एक जुलै ते सात जुलै या आठवड्यात या वन महोत्सव सप्ताह निमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.. या सायकल रॅली चे आयोजन वनविभाग व पर्यावरण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. ही सायकल रॅली जयस्तंभ चौक,संगम चौक, चिंचोले चौक सर्कुलर रोड मार्गे प्रमुख मार्गावरून राणी बाग या वन विभागाच्या कार्यालयासमोर झाडे लावून समारोप करण्यात आला आहे.. या सायकल रॅलीमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी भगवान पायघन,उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी प्रसाद गाजरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम तसेच वनविभाग कर्मचारी व पर्यावरण मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
