प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न मविआ सरकार स्थापन होण्याआधी पासून होत होता हा प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला. आता आम्ही विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची तयारी केली असल्याची प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेय. भविष्यात नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करण्याचा प्रयत्न करू. शिवसेनेत 2 3 वेळ फूट पडली मात्र नेते जातात शिवसैनिक कुठेही जात नाही त्यामुळे थोडा बहुत परिणाम होईल असे मतही शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेले काम तसेच तीनही पक्षांना अधिकार देऊन त्यांनी सरकार चालवून दाखवलं. महाराष्ट्रातील जनता फार संवेदनशील आहे त्यामुळे जनतेचा पाठिंबा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला राहील असा विश्वास व्यक्त करत असे नसते तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील जनता संवेदनशील आहे म्हणुन त्यांचा पाठिंबा ठाकरेंना आहे, तसे नसते तर फडणवीस मुख्यमंत्री असते.
