जनतेज न्युज

नागपूर कोरोना लेव्हल 1 मध्ये असताना लेव्हल 3 चे निर्बंध लावण्यात आले आहेत.

प्रतिनिधी , नागपूर : नागपूर कोरोना लेव्हल 1 मध्ये असताना लेव्हल 3 चे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आज शहरातील सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येत बाईक व कार रॅली काढत्यांन आली. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून व्यापाऱ्यांना लॉकडाऊन आणि निर्बंधामुळं  नुकसान सहन करावं लागतंय. आता जिल्ह्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. पॉझिटिव्हीटी रेट 0.04 वर आलाय. नागपूर जिल्हा लेव्हल 1 मध्ये आहे. मात्र, तरीही निर्बंध लेव्हल 3 चे लावण्यात आलेय. त्यामुळं दुपारी 4 पर्यंतच दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी आहे, तर शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन लावण्यात आलाय. त्यामुळं आम्ही व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न व्यापाऱ्यांनी केलाय. याविरोधात ‘सरकारला जागवा व्यापार वाचवा’ असं अभियान सुरू केलं असून याअंतर्गत आज बाईक व कार रॅली काढून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. सरकारनं निर्णय न घेतल्यास आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा ही ईशारा नाग विदर्भ ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी दिला.