प्रतिनिधी , शिर्डी : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर रोटी प्रश्न मिटला असला तरी राज्य शासनाने काही घटकांना आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र, सलून व्यावसायिकांच्या बाबतीत सापत्न भूमिका घेतली. या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी शिर्डी शहरातील नाभिक समाज बांधवांनी आंदोलन करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
नाभिक समाज च्या वतीने आंदोलन करण्यात आले. नाभिक समाज कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध नोंदविला यावेळी अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
व्यवसाय बंद असल्याने खचून जात अनेक समाजबांधवांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्या. याचा विचार शासनाने करायला हवा होता. नाभिक समाजाला मदत न देणे हा नाभिक समाजावर अन्याय आहे. नाभिक समाजाने किती अन्याय सहन करायचा? असा सवाल राहाता तालुका संपर्कप्रमुख नाभिक समाज संपर्कप्रमुख संतोष वाघमारे यांनी यावेळी उपस्थित केला.
