जनतेज न्युज

निफाडचे तापमान ६ अंश सेल्सिअस. थंडी वाढल्याने द्राक्ष धोक्यात. द्राक्ष मण्यांना तडे जाण्यास सुरुवात. शेतकरी पुन्हा संकटात.

प्रतिनिधी , निफाड : यावर्षी द्राक्षकाढणी हंगामास महिनाभर उशिराने सुरवात झालेली असतानाच निफाड तालुक्यात सोमवार रोजी ६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीय.सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा ६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीय.या हंगामातील दोन दिवसांत निच्चांकी नोंद झालीय.द्राक्ष मण्यांना तडे जाण्यास सुरुवात झालीय.शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय.
निफाड तालुक्यात सोमवार मंगळवार या दोन दिवसांत ६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची निच्चांकी नोंद झालीय.आता कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.
या थंडीमुळे चालू हंगामात द्राक्षबागायतदारांना दुसऱ्यांदा‌ मोठा दणका बसला आहे.
द्राक्षबागा परिपक्व अवस्थेत असताना आलेल्या थंडीच्या लाटेत द्राक्षमण्यांची फुगवण थांबलीय तर बहुतांश ठिकाणी द्राक्षमण्यांना तडे जाऊन सरासरी 30 टक्के नुकसान बागांमध्ये दिसून येतेय.
द्राक्षबागांतील द्राक्षघड परिपक्व झाले आहेत. त्यातच सकाळी व सायंकाळी थंडी अन्‌ दिवसा कडक उन्हामुळे द्राक्षमण्यांना तडे जाणे. एकूणच द्राक्षपंढरीत हंगामाची सुरवात अन्‌ थंडीची लाट एकाच वेळी आल्याने शेतकरी पुरता हतबल झालाय.