जनतेज न्युज

पनवेल काँग्रेस भवन वर धरणे आंदोलन…शेतकरी समर्थनात आंदोलन….

प्रतिनिधी , पनवेल : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.याआंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन केलं आहे. काँग्रेस पक्ष दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात आज आंदोलन केले असून, शेतकऱ्यांचं समर्थन तसंच केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायदा विधेयक रद्द करावे यासाठी आंदोलन केले.काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्षांना यासंदर्भात आदेश दिले असून आज पनवेल मध्ये काँग्रेस भवन येथे धरणे आंदोलन करण्यात आले.