प्रतिनिधी , औरंगाबाद : पल्स पोलिओ आजाराच्या उच्चाटनासाठी ३१ जानेवारी २०२१ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण केले जाणार आहे. आणि जी बालके लसीकरणासाठी उपस्थीत राहू शकणार नाहीत. अशा बालकांना एक दिवसाच्या विश्रांतीनंतर घरोघरी जाऊन ही लस देण्यात येणार आहे.
मनपाच्या कार्यक्षेत्रात 0 ते 5 वर्षाखालील एकूण 198 239 मुलांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने 38 रिपोर्टिंग युनिटच्या अंतर्गत एकूण 678 पल्स पोलिओ बूथ ठेवण्यात आले आहे याठिकाणी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शून्य ते पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजविले जाणार आहे यापूर्वी कितीही डोस पाजले असले किंवा बाळ नुकतेच जन्माला आले असेल किंवा बाळ किरकोळ आजारी असेल तरीही दिनांक 31 जानेवारी 2021 या दिवशी पोलिओ डोस देणे गरजेचे आहे यासाठी 40 वैद्यकीय अधिकारी 1890 कर्मचारी आणि 136 सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जी मुलं 31 जानेवारी 2021 रोजी पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहिले आहे त्यांना पुढील पाच दिवसात घर भेटीद्वारे पोलिओ डोस पाजण्यात येणार असल्याचे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या
