प्रतिनिधी , अण्णासाहेब पाटील यांच्या अखिल भारतीय मराठा संघाच्या नेतृत्वात सातत्याने मराठा आरक्षणा संदर्भात लढा देत आहे, या सोबतच अनेक विविध संगटना, तालुका स्तरावर किंवा जिल्हा पातळीवर सक्षम आहेत आणि सातत्याने कार्य करीत आहे.
अश्यातच शिवेंद्रराजे भोसले यांनी वक्तव्य केले की मराठा अरक्षणाचे नेतृत्व उदयनराजे आणि संभाजी राजेंच्या हाथी द्यावे, तर या वक्तव्यावर माझे मत असे आहे की हो त्यांचे स्वागत करायला हरकत नाही आहे परंतु, फक्त मीडिया समोर बोलून चालत नाही तर कार्य करून तुम्ही आम्हाला पाठबळ द्या.
मराठा आरक्षण हे कित्तेक दिवसांपासून प्रलंबित आहे या प्रश्नांवर आपले मत काय आहे, किंवा ज्या प्रकारे शिवाजी राज्यांची मराठा समजासाठी नेहमी पुढाकार घेतला त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा त्यांचेच वंश आहे तर आम्हाला वाटत की तुम्ही सुद्धा त्यांच्या सारखीच तळमळ दाखवून मराठा आरक्षणा साठी खंबीरपणे उभे राहून न्याय मिळून द्याल.
