प्रतिनिधी , सांगली : केंद्रीय आयकर आणि जीएसटी जाचक कायद्याच्या विरोधात विविध मागण्यांचे निवेदन सांगलीमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांना देऊन जाचक अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. टॅक्सेशन कन्सल्टंट असोसिएशनच्या वतीने या मागण्या करण्यात आले आहेत.
केंद्रीय आयकर आणि वस्तू व सेवा कर ताज यामुळे गेल्या काही वर्षांपासून कर सल्लागार,चार्टर्ड अकाउंटंट उद्योजक व्यापारी यांना या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत,कायद्यात असणाऱ्या जाचक अटीमुळे आर्थिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले आहे. आणि देशभर जीएसटी कार्यालयांना कायदा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात येत आहे,सांगलीमध्येही टॅक्सेशन कन्सल्टंट असोसिएशनच्या वतीने वस्तू व सेवाकर अधिकाऱ्यांना हाताला काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदवत कायद्यातील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आला आहे,यावेळी शहरातील अनेक चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार मोठया संख्येने उपस्थित होते.
