जनतेज न्युज

पाचोऱ्यात जैविक कचरा चक्क कोविड लसीकरण केंद्रासमोरी जागेतच जाळला..

प्रतिनिधी , जळगाव : पाचोरा शहरातील पंचायत समितीचे सभापती निवासस्थानी सध्या कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे याच केंद्रातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट ही समोरच्या मोकळ्या जागेत जाळून विल्हेवाट लावली जात आहे यामुळे या गंभीर प्रकारामुळे हा जैविक कचराची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सदर जैविक या कचऱ्याची
विल्हेवाट शहराबाहेरच्या परिसरातील मोकळ्या जागेतच लावली पाहिजे परंतु पाचोऱ्यात कोविड लसीकरण केंद्रासमोरी जागेतच हा जैविक कचऱ्याची विल्हेवाट जाळुनच लावल्या असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले.वास्तविक पाहता कोरोना काळात कोविड केअर सेंटर, कोविड रूग्णालय आणि शहरातील खासगी रुग्णालयातील जैविक कचऱ्याच्या संकलनासाठी वेगळी व्यवस्था असणे गरजेचे आहे.मात्र, कोरोना काळातच जैविक कचरा हा शहरातच मोकळ्या जागेत जाळून विल्हेवाट लावली जाते आणि हा जैविक कचरा संकलनाकडे संबधीत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.