जनतेज न्युज

पाणीपुरवठा योजनेसाठी भाजपाचे उपोषण ,२३ तारखेला जल आंदोलनाचा इशारा.

प्रतिनिधी , जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगांवकरांना २४ तास पाणी मिळाले पाहिजे यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रयत्न करून पाणी पुरवठा योजना तत्कालीन जलसंपदा मंत्री.आ.गिरिषभाऊ महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वरणगांव शहरासाठी २५ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती परंतु महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या योजनेला स्थगिती देण्यात आली या मुळे सरकारच्या विरोधात काळे कोर्टात गेले होते, कोर्टाने स्थगिती उठवली, परंतु पाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप ही सुरू न झाल्याने भारतीय जनता पार्टी च्या वतीने वरणगाव येथे रस्ता रोको ही करण्यात आला होता ,आज भारतीय जनता पार्टी च्या वतीने एक दिवसीय उपोषण वरणगाव येथील बसस्थानक चौकात करण्यात येत आहे जर ही पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करण्यात आली नाही तर येत्या 23 तारखेला जल आंदोलनाचा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला आहे