प्रतिनिधी, बुलढाणा :
पावसाळा हा ऋतू सर्वांना आवडणारा असतो उन्हाच्या काहिलीने जीव होरपळून निघतो आणि आपसूकच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना पावसाच्या सरीने चिंब भिजून जावेसे वाटते. पावसाच्या पहिल्या सरीत चिंब भिजण्याचा आनंद जरी मनाला सुखावत असला, तरी त्याबरोबरच साथीचे आजार होऊ नयेत, यासाठी आगामी पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक आहे. डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, काविळ, गॅस्ट्रो, उलट्या, जुलाब, सर्दी, टायफाइड, अतिसार यांसारखे साथीचे आजार होतात. पावसाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे विविध जलजन्य आजार उद्भवतात. या आजारापासून संरक्षण करायचे
असेल, तर आरोग्याची काळजी घेणे भगरीचे पदार्थ, राजगिराचे पदार्थ आवश्यक आहे. पाणी उकळून पिणे, भाजलेले व हलक्या आहारात नियमित समावेश पदार्थांचा आहारात समावेश करावा. पावसाळ्यामध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. ती टाळण्याकरिता घराच्या परिसरातील पाणी वाहते ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्यात डासाची उत्पत्ती होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी. घरातील उघडे पाणीसाठे असतील, तर त्यावर झाकण ठेवावे. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळवा. घरातील कुंड्या, कूलर्स यामधील पाणी नियमित बदलण्यात यावे. छतावर घराच्या परिसरात फुटके डबे, नारळाच्या करवंट्या, मातीचे माठ, गाड्यांचे खराब टायर्स व निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्यात. पावसाळ्यात वातावरण बदल व दुषित पाणी पिण्यात आले तर साथीचे आजार होऊ शकतात. त्यामुळे शुद्ध पाणी प्यायला हवे व विशेष काळजी घ्यायला हवी तसेच पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावलेली असल्याने अति तेलकट, पचण्यास जड असलेल्या पदार्थाचे सेवन करू नये असे आवाहन खामगांव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी केले आहे.
