जनतेज न्युज

पीओपीवरील बंदी उठवावी ही मागणी घेऊन बीडमध्ये कुंभार समाज आक्रमक..!

प्रतिनिधी , बीड : आता लढाई आर या पार ची आरोळी ठोकत , बीडमध्ये पीओपीवरील बंदी उठवावी.ही प्रमुख मागणी घेऊन विविध मागण्यांसाठी,कुंभार समाजाचे नेते अर्जुन दळे यांच्या नेतृत्वाखाली, कुंभार समाजाने रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.यावेळी पीओपी पासून मुर्त्या बनवण्यास घातलेली बंदी तात्काळ उठवावी.कोरोना काळात कुंभार समाज अतिशय डबघाईला आलाय त्यांना आर्थिक मदत करावी.मूर्तिकारांचे आर्थिक पुनर्वसन करण्यात यावे.या मागण्यासह अनेक मागण्यासाठी कुंभार समाज आज आक्रमक होत रस्त्यावर उतरला होता.दरम्यान समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष सुभाष राऊत यांनी देखील मोर्चाला पाठिंबा दिलाय.