प्रतिनिधि , सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांनी काही दिवसांपूर्वी उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर उपमहापौर राजेश काळे हे फरार होते. मात्र, पोलिसांना राजेश काळे हे आज पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पुण्याहून पाठलाग करत राजेश काळे यांना टेम्भूर्णीमध्ये अटक केली आहे. राजेश काळेंवर कलम 353, 385 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली आहे.
