प्रतिनिधि , मुंबई : देशात कोरोनाचे सगळ्या जास्त रुग्ण मुंबई महाराष्ट्रात आढळले असुन सर्वात जास्त रुग्ण दगावण्याची संख्याही मुंबई महाराष्ट्राचीच आहे. महाराष्ट्र सरकार ने कोरोनाचे मोठे पॅकेज देवु असं सांगीतले होते, कधी देणार आहेत ते मोठे पॅकेज..? केंद्राने लोकांसाठी पाठवलेल धान्यही महाराष्ट्र सरकार ने वेळेवर वाटलं नाही. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत केली नाही. आता कोरोना व्हॅक्सिन येणार आहे. ती व्हॅक्सिन लोकांना विकत घ्यावी लागणार आहे की महाराष्ट्र सरकार मोफत देणार आहे, असा आमचा सवाल आहे. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकार ने लोकांना कोरोना व्हॅक्सिन मोफत द्यावी असंही ते म्हणाले.
