जनतेज न्युज

संभाजी नगर येथील पिडीत संबंधीत महिलेने पुढे यावे.पोलीसांनी नि : पक्षपातीपणे तपास करावा – ना.डॅा.नीलम गोऱ्हे

प्रतिनिधि , संभाजीनगर मध्ये मेहबूब शेख यांच्याविरुद्ध एका पीडित तरुणीने तक्रार केली होती.
नोव्हेंबर 2020 मधली केस आहे.त्याच्यामध्ये गंभीर बाब असे निदर्शनास आलेली आहे, ही एक पीडित तरुणी आहे त्याचा पत्ता तिने चुकीचा दिला होता आणि त्याच्या मूळे त्याचा काहीच पत्ता लागत नाहीये ,पाठपुरावा करता येत नाही .
मी या घटनेत माध्यमातून दोन गोष्टीकडे आपले लक्ष वेधते.एक म्हणजे ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडे किंवा  विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर यांच्याकडे तिने संपर्क साधावा.
त्यांनाही ही भेटणे अवघड झालं तर शिवसेनेचे पदाधिकारी श्री. रेणुकादास राजू वैद्य, तिथेच संभाजीनगर मध्ये आहेत .( सभापती,मनपा तथा शिवसेना विधानसभा संघटक संभाजी नगर
पिडीततरुणी स्वतः ऐकत असतील तर स्वतः संपर्क साधावा किंवा याबद्दल काही माहिती असेल तर त्यामध्ये उगाचच  वेगवेगळे  बातम्यांतुन फक्त भूमिका घेण्यापेक्षा  प्रत्यक्ष तिच्यापर्यंत  पोलिसांना पोचून काय ते वस्तुस्थिती  समोर येऊ शकेल.
याघटनेमध्ये पिडीतेने ज्यावेळेला घरी येऊ नये सांगितलं गेले तेही बरोबर आहे कारण  काही वेळेला पोलीस पोहोचल्यावर  सगळ्यांना कळतं हीच ती तक्रारदार तरुणी आहे . परंतु त्याच्या पूर्वीही तिने काही अशा तक्रारी केल्या असतील तर त्यामध्येही
नि:पक्षपाती पणाने तपास होण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे मला असं निश्चितपणे वाटते.