प्रतिनिधी , कोल्हापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने सदरची वाहतूक बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत मात्र नागरिकांची विनाकारण गर्दी होत असल्याने प्रशासनास मदत कार्य राबवण्यास अडथळा निर्माण होत आहे जिल्ह्यातील नागरिकांना घरी राहून सहकार्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे तसेच महामार्गावरील पाणी उतरताच वाहतूक सुरळीत केली केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी दिली
