जनतेज न्युज

भर पावसात खा. राणाचा पाहणी दौरा ; खारतळेगावच्या पुरपरिस्थिची केली पाहणी

प्रतिनिधी , अमरावती : मागील तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुय. यात खारतळेगाव शेजारी असलेला नाला फुटल्याने गावात पाणी शिरले होते तर दोघे यात वाहून गेलेत. पावसाची संततधार सुरू असताना देखील खासदार नवनीत राणा खारतळेगाव येथे पोहचल्यात. खासदार राणानी येथील पुरपरिस्थिची पाहणी केली. खारतळेगाव हे नाल्यामुळे दोन भागात वसले आहे. पाऊस मोठ्या प्रमानात झाल्याने नाला तुडुंब भरून वाहतो आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. स्थानिक प्रतिनिधींनी याबाबत गावकऱ्यांना मदत कार्य सुरू ठेवले असून अधिक मदतीसाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा खासदार नवनीत राणा करणार असल्याच आश्वासन यावेळी राणा यांनी गावकऱ्यांना दिलंय.