प्रतिनिधी , सातारा : अतिवृष्टी मुळे वाई तालुक्याच्या पस्चिम भागामध्ये झालेल्या नुकसानीची कल्पना विराज शिंदे यांनी नानाभाऊ पटोले यांना दिली आनी लगेच पुणे येथील नियोजित दौरा अर्धवट सोडून नानाभाऊ वाई मध्ये दाखल झाले.वाई मधून बाहेर पडताना नावेचीवाडी येथील तसेच भोगाव आनी वरखडवाडी येथील ओढ्याचे पाणी रस्त्यांवरुन धोकादायक स्थितित वहात असतानासुद्धा नानाभाऊ पस्चिम भागामध्ये वेलंग येथे पोहोचले यावेळी जांभळी बाजुने आलेल्या तहसीलदार यांनी जांभळी ओढ्याचे पाणी पुलावरुन वहात आहे आपण कृपया जावू नये अशी विनंती केली त्यामुळे नानाभाऊ देवरुखवाडी येथे पोहचू शकले नाहीत.
अतिवृष्टी मुळे जांभळी,कोंढावळे येथील देवरुखवाडी येथील भयंकर परिस्थीतीची माहिती बापू शिंदे यांनी दिली बाधित लोकांना जास्तीत जास्त मदत करावी आनी संपूर्ण देवरुखवाडी चे पुनर्वसन करा म्हणून मागणी केली तसेच दरवर्षी रस्त्यांवरिल पुल वाहुन जातात त्यामूळे सम्पर्क तुटतो संपुर्ण पस्चिम भागातील पूल हे आर सी सी मध्ये करावेत अशी मागणी यावेळी उपस्थीत लोकांनी केली.
नानाभाऊ यांनी कलेक्टर शेखर सिंह यांना सूचना दिल्या आनी मदत व पुनर्वसन मंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांना पस्चिम भागाचा लवकरच दौरा करुन बाधित लोकांचे पुनर्वसन तसेच योग्य तो मोबदला मिळावा यासाठी तत्काळ पावले उचलावीत अशा सूचना दिल्या त्यामूळे लवकरच मदत व पुनर्वसन मंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांचा पस्चिम भागामध्ये दौरा होईल.नानाभाऊ यांच्या बरोबर युवक जिल्हाध्यक्ष श्री. विराज भैया शिंदे वाई तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री.रविंद्र आप्पा भिलारे वाई यूवक अध्यक्ष प्रमोद अनपट बापू शिंदे राजेंद्र शेलार प्रताप देशमुख कल्याणराव पिसाळ, महेश भणगे आनी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
