प्रतिनिधी : पुणे , पुणे महानगरपालिकेमध्ये १९९९ पासून बहूउद्देशीय पथकामध्ये स्वइच्छेने सेवा करणाऱ्या माजी सैनिक कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या २८/१०/२०१४ आदेशानुसार कायमस्वरूपी सेवेमध्ये तसेच माजी सैनिक कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून वर्षानुवर्षे मासिक वेतन न देता वारंवार कामामध्ये बदल करून देखील आजपर्यंत कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तसेच समाज विकास विभागातील मानधन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माजी सैनिक विकास परिषदेच्यावतीने ” कामबंद आंदोलन ” करण्यात आले .हे आंदोलन कामगार नेते डॉ. सुधाकरण पण्णीकरण यांच्या नेर्तृत्वाखाली करण्यात आले . या आंदोलनात माजी सैनिक विकास परिषदेचे पुणे महापालिका शाखा अध्यक्ष चंद्रकांत शशिकांत भोसले , सामाजिक विभागाचे अध्यक्ष नितीन ननावरे , दत्तात्रय जाधव , महेश मठाधिकारी , आबासाहेब अरगडे , अशोक गोडसे , अशोक शिंदे , मंदा कोंगारी , शलाका कांबळे , सुलभा साळुंके , प्रतिभा धिवार , अरुणा गायकवाड , बिना कनूजे , अशोक चव्हाण , दिलीप शेडगे व उध्दव निरफळ व अन्य कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांना मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने दिले . येत्या दोन ते तीन दिवसात कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन दिले जाईल . कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत लवकरात लवकर बैठक घेतले जाईल .मागील सात महिन्याचे वेतन व्याजासहित तातडीने देण्यात यावे , मानधन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये तातडीने सामावून घ्यावे , किमान वेतनाचा मंजूर झालेल्या दिनांक २४ फेब्रुवारी २०१५ ते आज पर्यंतची फरकाची रक्कम तातडीने देण्यात यावी , गणवेश भत्त्याची रक्कम तातडीने द्यावी , बहुउद्देशीय पथकामध्ये माजी सैनिक कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे , मासिक वेतन दहा तारखेच्या आत द्यावे , एक वर्षात २४० दिवसापेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजदारी पध्दतीने कामावर घेण्याची तसेच , ठेकेदारी पध्दतीने नेमणूक करण्याची पध्दत बंद करण्यात यावी . वर्षानुवर्षे सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे ., कामाचे स्वरूप कायमचे कायमचे ठरविण्यात यावे , सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बहुउद्देशीय पथकातील कर्मचारी यांना समान काम वेतन देण्यात यावे , सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सर्व कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करण्यात यावी , कामगार संघटनेसाठी पुणे महापालिका भवनमध्ये तात्काळ कार्यालय देण्याचे आदेश करावेत . आदी मागण्या मांडण्यात आल्या .
