जनतेज न्युज

पुणे लष्कर भागातील सेट मेरी चर्चच्या ग्राउंडवर उत्साहात साजरा

नाताळनिमित्त प्रभू येशू जन्मोत्सव सोहळा

प्रतिनिधी : पुणे , नाताळनिमित्त प्रभू येशू जन्मोत्सव सोहळा पुणे लष्कर भागातील सेट मेरी चर्चच्या ग्राउंडवर उत्साहात साजरा करण्यात आला . दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने पुणे शहरातील सर्व चर्चचे पाळक, सर्व ख्रिस्ती मंडळाचे रेव्हरंडस , व ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून प्रभू येशू जन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली . यंदा सोहळ्याचे १७ वे वर्ष होते .
यावेळी पुणे धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्हरंड थॉमस डाबरे , राईट रेव्हरंड पॉल दुपारे , रेव्हहड नाना दार , माजी राज्यमंत्री रमेश बागवे , रशीद खिजर , प्रभू येशू जन्मोत्सव सोहळ्याचे मुख्य संयोजक जोस्वा रत्नम , विश्वस्त रेव्ह. डॉ. सी. एस. किम , रेव्ह. डॉ. स्टीव्हन डेव्हिड , व्हाईस चेअरमन डॉ. संजीवन अश्रूड , रेव्ह. डॉ. एस. प्रेमानंद बाग , पास्टर शांताकुमार विल्यम , पास्टर रॉबिन महाडकर , रेव्ह. आर. जे. रणजी बाबु , जनरल सेक्रेटरी डॉ संजय कोरे , असोसिएट सेक्रेटरी पास्टर राहुल जेकब , ट्रेजअर एन जे वाईकर , जॉईंट ट्रेजअर रेव्ह. जयप्रकाश चव्हाण , एकजिटिव्ह मेंबर रेव्ह. कल्पेश शिरसाठ , रेव्ह. ए. प्रभाकर , रेव्ह. तीमोठाय किम , रेव्ह. जॉन ली , रेव्ह. पाऊलस पवार , रेव्ह . प्रीता जॉन , रेव्ह. सोफिया मकासरे , रेव्ह. प्रकाश नानिवडेकर , पास्टर पंगम , पास्टर सिमन चाचको , पास्टर संजय वानखेडे , पास्टर मेरी डिक्रूज , प्रा. विनोद पवार , ब्रदर जोएल शिरसाठ , नेहा लोंढे , संध्या लोंढे , इस्तर दार आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी प्रमुख वक्ते रेव्ह. ए. विलीसोन्स यांनी सांगितले कि , प्रभू येशू ख्रिस्त यांनी जगासाठी शांतीचा संदेश दिला . तारणासाठी परमेश्वराने त्याला म्हणजेच देवाच्या एकुलते एक पुत्राला म्हणजे प्रभू येशूला २००० वर्षांपूर्वी मनुष्यरूपाने या जगात जन्मास आणले . येशू ख्रिस्ताने जगाची सुटका पापापासून करण्यासाठी वधस्तभावर आपला प्राण दिला . आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा पुनरुत्थान झाले . आज जगात सर्वत्र हिसांचार व शांती फोफावली असताना येशू ख्रिस्ताने मात्र संपूर्ण जगासाठी शांतीचा संदेश दिला . थोडक्यात नाताळचा सार हा आहे कि , देवाने जगावर एवढी प्रीती केली कि , त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला . कि जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही . तर त्याला सार्वजनिक जीवन प्राप्त होते . सर्वांनी एकमेकांवर खरी प्रीती करावी . म्हणजे आपण कोणतेच वाईट कृत्य करू शकणार नाही . असा संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने दिला .यावेळी दोन्ही बिशप्सनी पुणेकरांना नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत प्रभू येशू जन्मोत्सव सोहळ्याचे मुख्य संयोजक जोस्वा रत्नम यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. संजय कोरे यांनी केले तर आभार विनोद पवार यांनी मानले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.