जनतेज न्युज

पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळापैकी एक अश्या शारदा गणपती मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारला!..

प्रतिनिधी , पुणे : पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळापैकी एक अश्या शारदा गणपती मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारला असून, 22 ते 25 तोळे सोन्याचे दागिने अन रोडक चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुणेकरांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या गणेश मंदिरात चोरी झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवस्तीत शारदा गणेश मंदिर आहे. प्रसिद्ध अश्या एक गणेश मंडळापैकी एक आहे. ऐन मध्यवस्तीत हे मंदिर आहे. दरम्यान मध्यवस्तीत सहसा मध्यरात्री देखील गर्दी असते. तर पोलिसांची गस्त देखील. पण या परिस्थितीत देखील चोरट्यांनी मध्यरात्री मंदिरात प्रवेश करून आतील दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा प्रकार पहाटे समोर आला. यानंतर माहिती मिळताच घटनास्थळी विश्रामबाग पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.