प्रतिनिधि , मुंबई : ऍमेझॉनच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली दिसून येते आहे. ॲमेझॉन पुण्याच्या वेअर हाऊसनंतर आता मुंबईतील चांदिवली परिसरात असलेले ऍमेझॉनचे कार्यालय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे फोडण्यात आले. मराठी भाषा अमेझॉन नाकारत असल्याने मनसेने सध्या ‘नो मराठी,नो अमेझॉन’ ही मोहीम राबवायला सुरुवात केली आहे.याचधर्तीवर आज पुणे आणि नंतर मुंबई अशी आंदोलने करण्यात आली.
