प्रतिनिधि , मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची पत्नी तृप्ती जाधव आणि सहकारी यांनी नवीन लॅकमे सलून सुरू करत नवीन व्यवसायाची सुरुवात केली.दादरमधील रानडे रोडवर या सलूनचा उदघाटन सोहळा अभिनेता अंकुश चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी अभिनेता अंकुश चौधरीने या नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.सोबतच लंडनमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेले काही कलाकार लवकरात लवकर भारतात येतील असा विश्वास व्यक्त केला.
