जनतेज न्युज

पूर्वीच्या विषाणू पेक्षा या नवीन विषाणूच्या संसर्गाचा वेग 70 टक्‍क्‍यांपेक्षा आधीक आहे त्यामुळेच राज्य सरकार हा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहे : आरोग्य मंत्री राजेश टोपे

प्रतिनिधी , औरंगाबाद : ब्रिटिनसह युरोपीय देशात कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे त्यामुळे हा पूर्वीच्या विषाणू पेक्षा या विषाणूचा संसर्गाचा वेग 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेऊन सतर्कता बाळगावी राज्यात या नव्या विषयाचे बाधित एकही रुग्ण शहरात नाही असे आरोग्य मंत्री राजेश टोपे पत्रकार परिषदेत बोलत होते एम आय टी रुग्णालय आणि संशोधन केंद्रात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या याबाबतची माहिती देण्यासाठी तसेच येथील रुग्णांना निरोप देण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे औरंगाबाद शहरात आले होते एमआयटी रुग्णालयात सात रूग्णांच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या अतिशय क्लिष्ट शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवदान देण्यात आले त्यातील सहा रुग्णांना रुग्णालयातून सुटी झाली या शस्त्रक्रियावर आधारित डॉ. सुहास बाविकर यांच्या शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळाले तसेच रक्तगट जुळत नसलेल्या एका रुग्णाला ही प्लाजमा थेरपीनंतर त्याच्या किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली त्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
तसेच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नवीन विषाणू घातक आहे त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार योग्य ती खबरदारी आणि उपाययोजना करीत आहे ब्रिटन हुन येणारे प्रवाशांना अलगीकरणत ठेवले जात आहे त्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणेसह प्रशासनही प्रयत्नशील आहे असे ते यावेळी म्हणाले