जनतेज न्युज

पेठवडज येथील ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात उपोषण

प्रतिनिधी, नांदेड : तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठवडज येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी कंधार येथील गटविकास अधिकारी यांचे दालनात विविध मागण्यासाठी आमरण उपोषणास सुरुवात केले आहे. मागील अनेक दिवसांपासून पेठवडज येथील जिल्हा परिषद शाळेत, प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखान्यात असलेली रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत होती. मात्र प्रशासनाने यावरती कुठलीही दखल घेतली नसल्याने सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनी गावकऱ्यासह कंधार येथील गटविकास अधिकारी यांच्या दालना पुढे आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या मान्य नाही होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया नारायण गायकवाड यांनी दिली आहे .