प्रतिनिधि , नागपूर : नागपुरातील पारडी पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. मुलीला भूत बाधा लागल्याचे सांगत मांत्रिकाने घेतला. एकाच कुटुंबातील चार महिलांवर अत्याचार केला. कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपी मांत्रिकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धार्मिक निनावे असे मांत्रिकाचे नाव आहे.
पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत एका कुटुंबातील मुलीची प्रकृतीत चांगली नसल्याने रुग्णलायत नेऊन औषधउपचार करण्याऐवजी मंत्रिकाच्या नादाला लागले. यावेळी ओळखिच्या मंत्रिकाकडे नेऊन पूजा पाठ करण्यासाठी सांगितले. त्यासाठी पीडित मुलीच्या वडिलांकडून पैसे उकडलेले. पण कुटुंबातील सदस्याचा जीवाला भीती असल्याचे सांगत त्याने पीडित युवती आणि तिच्या आई, मामी, आजीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत पुढे आले आहे.
पीडितेला दाखवला आई वडिलांच्या मृत्यूचा धाक…
यात पीडित युवतीशी तब्बेत बरी नासल्याचा कारनाने तिच्याशी पूजा पाठ करताना शाररिक शोषण केले. यात आई वडिलांच्या मृत्यू होईल असे बतावणी करत जवळपास दोन महिने तिच्यावर अत्याचार केला. यात आई मामी आणि आजी तिघीनिहा कुटुंबातील जीवाचा धोका आहे अशी भीती दाखवत त्याने चौघींवर अत्याचार केला.
दलेवाले बाब…
धार्मिक निनावे उर्फ दुलेवाले बाबा असे मांत्रिकाने नाव आहे. पेशाने ऑटोचालक असून पीडित युवतीच्या वडिलांशी ओळख होती. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगितल्याने दुलेवाला बाबाने पूजा करण्यास सांगितले. यात पैसेही घेतले. चंद्रपूर आणि छत्तीसगडच्या डोंगरगड येथील मंदिरात पूजा करण्यासाठी नेले. याच दरम्यान त्याने जीवाची भीती दाखवत एका पाठोपाठ चार महिलांना आपल्या वासनेचाचा शिकाल बनवले.
आणखी गुन्हे असण्याची शक्यता….
या प्रकरणात आरोप धार्मिक निनावे याला अटक केली आहे. यात 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळवली असून तपास सुरू आहे. यात त्याने आणखी कोणाला फसवले आहे का हे तपासण्याचे कामही पोलीस करत आहे. यात लाखो रुपये त्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पूजेच्या नावावर त्याने घेतले असल्याचे पारडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गांगुर्डे यांनी सांगितले.
