प्रसिद्ध दिग्दर्शक ,लेखक ग.दि माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पुणे महापालिकेच्यावतीने पुढील एका महिन्यात ग.दि.मा स्मारकाचे भुमीपुजन होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
प्रतिनिधी , पुणे : गेल्या काही वर्षापासुन रसिक प्रेमी,साहित्यिक यांनी ग.दि.माडगुळकरांचे स्मारक पुण्यात व्हावे .याची मागणी केली होती.पण प्रशासनाच्या कागदीघोड्यामध्ये या स्मारकाला गती मिळु शकली नाही .याकरता माडगुळकर कुटूंबियांनीही पाठपुरावा केला होता.अखेरीस प्रशासकीय मान्यता याकरता लागणारी आर्थिक तरतुद करण्यात आली असुन कोथरुड परिसरातील महात्मा फुले सोसायटीच्या प्रांगणात महापालिकेच्या जागेत हे स्मारक होणार आसुन लवकरच त्याचे भुमिपुजन केले जाईल. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
